भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय इन मराठी?| What is the best Bhastrika Pranayama in marathi 2023

भस्तिका प्राणायामाचे महत्त्वाचे फायदे ?| Important Benefits of Bhastrika Pranayama

नमस्कार मित्रांनो मागच्या blog मध्ये आपण पहीला blog अनुलोम विलोम प्राणायाम , कपालभाती प्राणायाम आता पाहणार आहोत भस्त्रिका प्राणायाम .हा blog पाहण्याआधी मागचे ब्लॉग नक्की वाचा . मित्रांनो लेखनाच्या स्वरूपात healthyfyyoga blog या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रणायमाचे महत्व आपल्या सर्वांना माहीत आहेच . नियमित व्यायाम सराव केल्याने आपले आरोग्य च नाही तर मन ही ताजेतवाने व निरोगी राहते.भस्त्रिका प्रणायम हा एकमेव असा प्राणायाम आहे .जो आपल्या शरीरातील अंतर्गत अशुद्धता दुर करतो.

सुदृढ शरीरासाठी केवळ चांगला आहारच उपयोगी ठरतो असा समज असेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करत आहात.चांगल्या आहारा सोबत ,योगाची साथ असेल तर 100% तुमच्या शरीराला अधिक फायदा होतो.गेल्या काही वर्षांत योग पध्दती संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली आहे.

नियमितपणे प्राणायाम केल्याने आपले शरीरच नव्हे तर आपले मन ही निरोगी व ताजेतवाने व प्रसन्न राहते . भस्त्रिका प्राणायाम ( how to do bhastrika pranayam)हा एकमेव असा प्राणायाम आहे आपले आरोग्यच नाही तर आपल्या शरीरातील अंतर्गत अशुद्धता दुर करतो. आज आपण या लेखातून भस्त्रिका प्राणायाम बंद्ल माहिती जाणून घेणार आहोत . त्यासाठी तुम्ही पुर्ण blog काळजीपूर्वक लक्ष देउन वाचा .

. 1. भस्त्रिका प्राणायाम कशापासून तयार झाला ? What is Bhastrika Pranayama formed from?

. 2. भस्त्रिका प्राणायाम कसे करावे?How to do Bhastrika Pranayama

3. भस्त्रिका प्राणायामाचे महत्त्वाचे फायदे? Important Benefits of Bhastrika Pranayama

. 4. भस्त्रिका प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी ?,Precautions to be taken while performing Bhastrika Pranayama

5. भस्त्रिका प्राणायाम इतर अवयवासाठीही लाभदायक? Bhastrika Pr^anayama is also beneficial for other organs

भस्त्रिका प्राणायाम कशा पासून तयार झाला? What is Bhastrika Pranayama formed from?

भस्त्रिका हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ ‘भाता’ असा आहे. लोहार भात्या मार्फत जलद हवा सोडून लोखंड गरम करतो आणि त्यातील अशुद्धता दूर करतो. त्याचप्रमाणे, भस्त्रिका प्राणायाम शरीरातील सर्व नकारात्मकता आणि अशुद्धता दूर करण्यासाठी भाता म्हणून कार्य करते. वात, पित्त आणि कफ या समस्यांसाठी भस्त्रिका प्राणायाम उपयोगी आहे जगभरात दररोज प्रदूषणाची पातळी वाढतच चालली आहे, ज्यामुळे दूषित हवा, धूळ आणि घाण आपल्या फुफ्फुसात घर करून बसतात. अशा परिस्थितीत भस्त्रिका प्राणायाम करणं आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतं.

भस्त्रिका प्राणायाम करण्याची योग्य पद्धत?

 • कोणत्याही प्रसन्न व शांत वातावरणात सिद्धासन, वज्रासन किंवा पद्मासनात बसा.

जर तुम्हाला या आसनांमध्ये बसणे शक्य नसेल तर कोणत्याही आरामदायक स्थितीत बसून आपली मान, शरीर आणि डोके सरळ ठेवा.

 • यानंतर आपले डोळे बंद करा आणि काही काळासाठी शरीर सैल सोडून आराम करा व आपले तोंड बंद करा. योगा सुरू करण्यापूर्वी आपल्या नाकपुड्या देखील व्यवस्थित स्वच्छ करा
 • आपले हात चीन किंवा ज्ञान मुद्रेमध्ये ठेवा
 • हळू हळू श्वास आत खेचून घ्या
 • आता श्वास जोरात आत खेचून तसाच बाहेर सोडा
 • भस्त्रिका प्राणायाम करताना तुम्हाला छाती फुगवून पुन्हा आत घ्यायची आहेया
 • प्राणायामचा अभ्यास तीन वेगवेगळ्या श्वासोच्छवासाच्या भागांत केला जाऊ शकतो. पहिल्या भागात हळू हळू म्हणजेच 2 सेकंदात 1 वेळा श्वास घ्यावा, द्वितीय भागात मध्यम म्हणजेच 1 सेकंदात 1 वेळा श्वास घ्यावा आणि तिस-या भागात वेगवान पद्धतीने म्हणजेच 1 सेकंदात 2 वेळा श्वास घ्यावा
 • सुरूवात सौम्य गतीने करा
 • ही प्रक्रिया 4 ते 5वेळा करा.
 • ही प्रक्रिया 4 ते 5 वेळा पुन्हा पुन्हा केल्यानंजस जशी आपल्याला याची सवय होईल तस तसं आपण दररोज 15 श्वास वाढवू शकता

प्राणायामाने फायदा काय होतो ?

What are the benefits of Pranayama?

 • . ओटीपोटात चरबी कमी होईल: भस्त्रिका प्राणायाम असा प्राणायाम आहे जो सतत केल्याने तुमच्या पोटाची चरबी कमी होते. पण यासाठी सतत सराव करणे आवश्यक आहे
 • वजन कमी होते: जर हा प्राणायाम दररोज 10 ते 15 मिनिटे केला गेला तर आपले वजन देखील कमी होते .
 • भुक वाढवते: सतत भस्त्रिका प्राणायाम केल्याने वेळेवर भूक लागते
 • शरीरात उष्णता प्रदान करते: हथप्रदीपिका २/65 अनुसार, भस्त्रिका प्राणायाम हवा व पित्त यांमुळे होणारे बहुतेक रोग दूर ठेऊन शरीरात उष्णता निर्माण करते
 • श्वासोच्छ्वासाच्या समस्या दूर करते: श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम प्राणायाम आहेनाडी प्रवाह शुद्ध करते:
 • हा प्राणायाम नाडी प्रवाह शुद्ध करतो
 • भस्त्रिका प्राणायाम करताना घ्यावयाची काळजी ?
 • तुम्हाला उच्च बीपीची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा प्राणायाम करू नका
 • भस्त्रिका प्राणायाम करण्याच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर अजिबात पाणी पिऊ नका
 • जर आपल्याला पाण्याची खूप गरज भासत असेल तर प्राणायाम झाल्यावर फक्त 2 घोट कोमट पाणी प्या
 • भस्त्रिका प्राणायाम करण्याचा उत्तम वेळ सकाळीच आहे. जर आपण संध्याकाळी हा प्राणायाम करणार असाल तर लक्षात ठेवा की जेवणानंतर 4 ते 5 तासांचं अंतर यामद्ये हवं
 • भस्त्रिका प्राणायाम करताना तुम्हाला चक्कर येत असेल किंवा तुमचे डोके चक्रावत असेल तर अशावेळी हा प्राणायाम करणे थांबवा आणि ताबडतोब शवासनमध्ये झोपा
 • उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने भस्त्रिका प्राणायाम करू नये
 • हृदयरोग, चक्कर, ब्रेन ट्यूमर, मोतीबिंदू, आतड्यांसंबंधी किंवा पोटाच्या अल्सर असलेल्या रूग्णांनीही भस्त्रिका प्राणायाम करू नये
 • उन्हाळ्याच्या दिवसांत सितली किंवा सितकरी प्राणायाम या नंतर करावा, जेणेकरून आपल्या शरीरात जास्त उष्णता निर्माण होणार नाही
 • काही लोकांसाठी भस्त्रिका प्राणायाम करणं खूप घातक असू शकतं म्हणूनच ते योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच सुरू केले पाहिजेत.
 • भस्त्रिका प्राणायाम इतर अवयवासाठीही लाभदायक?
 • आपले जीवन फक्त श्वासावरांवरच अवलंबून असते. अपुर्‍या ऑक्सिजनमुळे शरीरात अनेक गंभीर आजार जन्म घेऊ शकतात. भस्त्रिका प्राणायाम ( bhastika pranayam in marathi)फुफ्फुसांसह डोळे, कान आणि नाकाचे आरोग्य राखण्यासाठीही लाभदायक आहे. या प्राणायामामुळे पचन संस्था, यकृत आणि मूत्रपिंड या अवयवांची देखील एक्सरसाइज होते. याव्यतिरिक्त लठ्ठपणा, दमा, क्षयरोग आणि श्वसनाशी निगडीत रोग नाहीसे होतात. स्नायूं संबंधित कोणत्याही रोगासाठी भस्त्रिका प्राणायाम फायदेशीर मानला गेला आहे. भस्त्रिका प्राणायामाच्या नियमित सरावामुळे शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त प्रवाह देखील योग्यरित्या होतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Pin It on Pinterest

Scroll to Top